जीवन म्हटलं की संघर्ष तर येणारच, संघर्ष तर सगळेच करतात पण यश प्रत्येकाला मिळते अस नाही. तरी माणसाचा संघर्ष हा चालू असतोच. प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टीसाठी संघर्ष करत असते. काही चांगल्या मार्कांसाठी, काही नोकरी साठी, काही जीवनासाठी, काही पैसा मिळवण्यासाठी असे प्रत्येकाचे वेगवेगळे संघर्ष असतात. तसंच काही जण प्रेमासाठी संघर्ष करतात. ज्यामधून काही प्राप्त होणार नसतं. उगाच आपला वेळ आणि ऊर्जा वाया घालत असतात. एका ठिकाणी मी वाचलं होतं की
” प्रेम हे एक असं जंगल आहे जिथे एक शूर वाघाची शिकार एका सुदंर हरिणाकडून होते”
तरी लोक संघर्ष करतात. पुढे आड आहे म्हटलं तरी ते न ऐकल्यासारखं करून पुढे जातात. हे झालं संघर्षाचं.
आता संघर्षाचे प्रयत्न तर खूपच भारी सुरुवात होते ती
त्याव्यक्तीच्या मागे फिरण्यापासून त्यासमोरच्या व्यक्तीला माहीत पण नसते काय चालू आहे ते. दुसरा टप्प्या येतो देवाचे पाय धरायचा, देवाकडे एकच प्रार्थना तो/ ती मला मिळू दे, मग मी नारळ फोडतो/फोडते, उपवास धरतो/धरते. तेच काम आहे देवाला त्यांच्यासाठीच बसलाय तो तिथे. अश्या प्रकारचे प्रयत्न चालू असतात. या संघर्षात माणसाच्या विचाराची काही सीमा नसते. हे सगळे उद्योग एका व्यक्तीसाठी जी व्यक्ती पुढे चालून आपलीच शिकार करणार आहे. स्वतःच्या पायावर दगड मारणं म्हणतात ना ते यालाच म्हणतात. संघर्ष करायचाय तर चांगल्या गोष्टीवर केलेला कधी पण चांगला. असं म्हणतात दुनिया गोल आहे? अर्थात कोणतं ना कोणतं कार्य आपल्याला जवळ आणत असत. कितीही नाही म्हंटलं तरी ते आपल्या हातातून घडतं असत. किंवा अगदीच नकळतपणे सुद्धा..!! म्हणजे काही झालं तरी शिकार तर होणारचं आहे आपली.
:- पंकज हिप्परगे
+919595678833