माणसाला माणूस म्हणणं चुकतंय का खरंच?
कारण आवडणाऱ्या चेहऱ्यानं नकार दिला म्हणून
तिचा चेहरा बिघडावन
तिचा छळ करणं
तिच्यावर आरोप करणं
प्राण जाईपर्यंत तिच्यावर वार करणं
एवढंच नाही तर
तिचे तुकडे करून शिजवणं
माणसाला माणूस म्हणणं चुकत नाही
माणसानं माणूसपण विसरलंय
कात काढून टाकलेल्या सपासारखं
माणूसपण काढून टाकलंय
अन स्वीकारलंय कळपातल्या लांडग्याचं रूप
:- पंकज हिप्परगे
+91-9595678833