कधी कधी वाटतं
देवानं माणसाला कामापुरती बुद्धी दिली असती
तर बर झालं असतं
कारण एवढंच…..
फुकटचे सल्ले देणं तरी बंद झालं असतं
जेणेकरुन स्वतःला निर्णय घेता आला असता
.
दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावले तर नसते
यामुळं ढवळाढवळ बंद तर झाली असती
.
सरळ जगणाऱ्याला सरळ जगू दिले तर असते
त्यामुळं नीट जगता आलं असतं
.
कोणाच्या वाटेत आडवे आले नसते
ज्यामुळं वाट बदलावी लागली नसती
.
म्हणजे कसं
बिनकामाच्या उचापात्या नको
.
म्हणून वाटतं की
देवानं माणसाला कामापुरती बुद्धी दिली असती
तर बर झालं असतं
:- पंकज हिप्परगे
+91 9595678833