मी कोणावर विश्वास ठेवत नाही
याचा अर्थ असा नाही की
माझ्यासाठी विश्वासपात्र कोणच नाही
मी कोणावर प्रेम करत नाही
याचा अर्थ असा नाही की
माझ्यासाठी प्रेम हे काहीच नाही
मी कोणावर दया दाखवत नाही
याचा अर्थ असा नाही की
मला कोणावर दया येत नाही
मला एकटं राहावं वाटत
याचा अर्थ असा नाही की
मला कोणाची सोबती नको
एका सीमेपर्यंत काही गोष्टी बऱ्या असतात
सीमा ओलांडली की काही उरत नाही
:- पंकज हिप्परगे
It really sutes on me ☺
LikeLiked by 1 person
😍😍😅
LikeLike