संवाद

संवाद तर होयचा नाही आमचा
संवाद करावं म्हटलं तर
संवाद राहायचा लांब
वादविवाद होयचा चालू
ना माझं मत व्यक्त
ना त्यांचं मत समजायचं
असचं चालू असायचं नेहमी
आन संवाद राहायचा लांब
यात मला माझी चूक दिसायची नाही
आणि त्यांचं मत पण समजायचं नाही
ना मला माझी बाजू मांडता आली
ना त्यांची बाजू मला समजली
राहायचा तर फक्त दुरावा
जो कधी दूर होयचा नाही
असा आमचा संवाद असायचा
पप्पांचा आन माझा

:- पंकज हिप्परगे

Unknown's avatar

Author:

नमस्कार, मी पंकज हिप्परगे आपलं स्वागत आहे माझ्या ब्लॉगवर जे काही मनाला उमजलं ते प्रेमभाव कवितेच्या रूपात आणि लेखाच्या मी पानावर उमटवलय... नक्की वाचा आणि आपला अभिप्राय द्या.

2 thoughts on “संवाद

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.