अचानकचं ती समोर दिसली
आन…
भरत आलेल्या जखमेची
हळूच खपली निघावी
तशी परिस्थिती झाली
हृदयाचे ठोके तर…
काय करावं काहीच सूचना
तिला पाहताच…
जुन्या आठवणींना
पालवी फुटावी
तशी परिस्थिती निर्माण झाली
सोबतचे क्षण, सोबतचे किस्से
सोबतचे वाद, सोबतचे संवाद
सगळंच अलगद टोचू लागलं
आली तर हलक्या पावलांनी
पण गेली वणवा पेटवून
आधीच्या वणव्याची आग
आजून विझली देखील नव्हती
अप्रत्यक्ष का होईना
त्यात भर पाडून गेली ती
शेवटी फक्त एवढंच समजलं
जीवनातला लांडगा होती ती…..
:- पंकज हिप्परगे
+91 9595678833
Good 👍 👌
LikeLiked by 1 person
Thank you
LikeLike
💯✌🏻🙏
LikeLiked by 1 person
Humm
LikeLike