वाट एक तर चालवते
अथवा पळवते
किंवा धपकन तोंडाशी पाडते
मग रस्ता कसाही असो
काही वाटा यश देतात
तर काही वाटा अनुभव देतात
वाट चुकीची दिशा दाखवते
अथवा योग्य वाट दाखवते
किंवा वाट चुकीची दिशा सुधारते
ज्यावेळी समजलं की
वाटेची काशी केली आपण
त्यावेळी ती वाट
त्या वाटेला जाळून टाकते
आन नवी वाट दाखवते
त्यामुळे काही वाटा अनुभव देतात
आणि काही वाटा केवळ
वाट लावण्यासाठी असतात
वाटा तर आपल्यासाठीचं असतात
फक्त नजर आणि योग्य दिशा पाहिजे
वाट आपोआप सदृश्य होईल
:- पंकज हिप्परगे
+91 9595678833
💯
LikeLiked by 1 person
Thx
LikeLike
👌👌nice 👍
LikeLiked by 1 person
Thanks
LikeLike