शाळा

शाळा म्हटलं की
नकळत हस्य येत चेहऱ्यावर
शाळेतल्या आठवणी उलगडायला लागतात
आणि आठवणींची सुरुवात होते
तिच्यापासून
ती होती म्हणून तर
त्या आठवणी गोड वाटतात
तिला मिळवण्यासाठी केलेली धडपड
भिंतीवर,फळ्यावर लिहिलेले तिचे नाव
तेव्हा केलेले सगळे प्रताप
एक एक करून आठवायला लागतात
तिच्यासाठी झालेला राडा
सेंडअप दिवशी केलेली मारामारी
मग तिने केलेली सर मॅडमला तक्रार
आणि तिथे पडलेला मार
या सगळ्या आठवणींच्या खपल्या निघायला लागतात
लहान असताना नको असलेली शाळा
9वी 10 वी ला हवी हवी वाटायची
याच कारणही तिचं
शाळेमध्ये गां* तिच्यामुळेचं लागते
तरी गां* लावून घ्यायला मज्जा वाटते
शाळेत वाट चुकायची फक्त तिच्यामुळेचं
काहीही झालं ते दिवस त्या आठवणी
विसरता येणार नाहीत बक्कळ जगलो त्याक्षणी
एक वेगळंच जग होत ते
छोटसं होत पण जाम भारी

:- पंकज हिप्परगे
+91 9595678833


Unknown's avatar

Author:

नमस्कार, मी पंकज हिप्परगे आपलं स्वागत आहे माझ्या ब्लॉगवर जे काही मनाला उमजलं ते प्रेमभाव कवितेच्या रूपात आणि लेखाच्या मी पानावर उमटवलय... नक्की वाचा आणि आपला अभिप्राय द्या.

6 thoughts on “शाळा

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.